खबरदार ! औरंगाबाद मध्ये सुद्धा करोना ग्रस्त रुग्ण

Foto
औरंगाबाद : मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील हा पहिलाच करोनाचा रुग्ण असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३२वर पोहोचली आहे.

औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या महिलेचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचं सांगण्यात येत. या महिलेला धूत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर ही महिला ज्या लोकांच्या संपर्कात आली होती, त्या सर्वांची माहिती घेण्यात येणार असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या महिलेच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं माहिती सांगितलं.